Sun. Apr 18th, 2021

अमळनेर नगरपरिषदेचे 22 नगरसेवक अपात्र!

अमळनेर शहरातील काही अतिक्रमणं हटवण्यास तात्पुरती स्थगिती दिल्याने अमळनेर नगरपरिषदेचे 22 नगरसेवक अपात्र ठरवण्यात आले आहेत. नगराध्यक्षांसह आठ सदस्यांवर देखील टांगती तलवार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या आदेशानंतर अमळनेर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी हे आदेश दिले आहेत.

अमळनेर शहरातील काही अतिक्रमणाबाबत विद्यमान अमळनेर नगर परिषदेच्या कार्यकारिणीने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव 2017 मध्ये एप्रिल महिन्यात तात्पुरती स्थगिती दिली होती.

त्यानंतर स्थगिती उठवण्यात आली होती. मात्र आमदार शिरीष चौधरी गटाने यासंदर्भात जिल्हाधिकारी  किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे तक्रार करून नगराध्यक्षांसह २२ नगरसेवक अपात्र करण्याची मागणी केली होती.

त्यावर २९ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी २३ जणांना अपात्र करण्याचे आदेश दिले होते. लागलीच सत्ताधारी गटाने ३० जानेवारी 18 रोजी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अपिल दाखल केलं होतं.

त्यात त्यांनी नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ५५ अ तसंच ५५ ब नुसार नगराध्यक्षांना अपात्र करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत तसंच कोणताही ठराव रद्द करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायला पाहिजे होता आदी त्रुटींचे मुद्दे उपस्थित केले होते.

पाटील यांनी सुनावणी घेऊन निकाल दिला नव्हता. त्याविरोधात शिरीष चौधरी गटाच्या प्रवीण पाठक यांनी मागणी करून उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केलं होतं.

न्यायालयाने मंत्री रणजित पाटील यांनी २ आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा 22 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाबाबत दोन आठवड्याच्या आत आता अपील करता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *