अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात चक्क आढळल्या अळ्या
अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. अशाप्रकारे खाद्यपदार्थांमध्ये आरोग्याला घातक असे घटक सापडत आहेत.

अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. अशाप्रकारे खाद्यपदार्थांमध्ये आरोग्याला घातक असे घटक सापडत आहेत. गेल्या काही दिवसात नालासोपाऱ्यातील खाद्यपदार्थात शौचालयातील पाणी वापरत असल्याचे समोर आले होते. तर कुर्ल्यातही अतिशय घाणेरड्या पद्धतीने सरबत बनवणार असल्याचे समोर आले होते. यानंतर अशा खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. नगर शहरातील हातगाडी वरील पाणीपुरीच्या ठेल्यावरील प्रकार सजन नागरिकांच्या लक्षात आल्याने पाणीपुरीवाल्याला पाणी फेकून देण्यास भाग पाडले.
मात्र शहरात अशा अनेक परप्रांतीय लोकांच्या पाणीपुरीच्या गाड्या असून त्यावर रोडवरच पाणीपुरी विकली जाते. मात्र त्यांच्या स्वच्छतेबाबत आणि पाणी उपलब्धतेबाबत कधीही कोणी पाहत नसल्याने अशा लोकांचं नेहमीच फावलं जात आहे.
अहमदनगर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अथवा अन्न औषध प्रशासन यांनी कधीही अशा गाड्यांची तपासणी केली अथवा कारवाई केल्याचं ऐकवत नाही त्यामुळे अशा घाणेरडे पाणी नागरिकांना देण्याची हिम्मत लोकांची होत आहे.
काही सजक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला म्हणून पाणीपुरीवाल्याने आपले पाणी फेकून देत आपली चूक असल्याचं कबूल केली मात्र असे अनेक पाणीपुरीवाले नगर शहरात आहेत त्यांच्याबाबत आणि त्यांच्या तपासणीबाबत काय होणार हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.