Wed. Oct 27th, 2021

आयपीएलच्या फायनलमधे मुंबईची धडक दिल्लीवर एकहाती विजय

मुंबई सोबत अंतिम सामना जो संघ खेळेल त्याला मुंबई सोबत कडवी झुंज द्यावी लागणार एवढे मात्र नक्की…

आयपीएलची स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात येत असून काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली कॅपिटल यांच्या सामन्यात मुंबईने बाजी मारली असून आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईने आपले स्थान निश्चित केले आहे.
मुंबईने प्रथम फलंदाजी करत २०० धावांचा डोंगर रचला आणि दिलीला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य पूर्ण करत असताना १४३ धावातच मुंबईने दिल्लीला रोखले कालच्या सामन्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्ही क्षेत्रात मुंबई दिल्ली पेक्षा उजवी ठरली आणि सहज दिल्लीवर मात केली.

दिल्लीने कालचा सामना जरी गमावला असला तरी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी अजून एक संधी दिल्लीला मिळणार आहे.
३ आणि ४ स्थानावर असलेल्या हैद्राबाद आणि बंगळूरू यांच्यात आज मुकाबला होणार आहे. आजच्या सामन्यातील विजयी संघ हा दिल्ली सोबत सामना खेळेल, त्यानंतरच मुंबई सोबत अंतिम सामना कोण खेळणार हे समजेल.
मुंबईने आजपर्यंत ४ वेळा आयपीएल ची स्पर्धा जिंकली आहे. गतवर्षी देखील मुंबईने ही स्पर्धा जिंकली होती, त्यामुळे मुंबई सोबत अंतिम सामना जो संघ खेळेल त्याला मुंबई सोबत कडवी झुंज द्यावी लागणार एवढे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *