Tue. Oct 27th, 2020

उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरण; नितेश राणेंसह 18 कार्यकर्त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.

महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला. या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणेंना कोठडी

आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की,चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

तसेच काल सायंकाळी त्यांच्यासह 18 स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक केली होती.या सर्वांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आमदार नीतेश राणे यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वास्थतेमुळे त्यांना उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले होते.दुपारी एक वाजता श्री.राणे यांना पोलिस कोठडीत आणण्यात आले.

तर दुपारी साडे तीन वाजता त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.या सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार नीतेश राणेंसह सर्व 18 जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *