Wed. Dec 1st, 2021

कसोटी मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने घरच्या मैदानावर अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारताने 3-0 ने कसोटी मालिका खिशात घातली.

तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने घरच्या मैदानावर अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. यामुळे 3-0 ने कसोटी मालिका भारताने जिंकली आहे.
तिसऱ्या दिवशी आफ्रिकेची 8 बाद 132 धावा अशी पडझड झाली होती. शाहबाज नदीमने अखेरचे दोन फलंदाज तंबूत धाडले.

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी निर्णय घेत 497 धावा काढल्या. या आव्हानाच पाठलाग करत असताना आफ्रिकेचा पहिला डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला.
आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपला. भारताला 335 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला. मात्र दुसऱ्या डावातही आफ्रिकेला सावरता आले नाही.

भारताच्या शाहबाद नदीमने नववा फलंदाज बाद केला. त्यानंतर लगेचच त्याच्याच गोलंदाजीवर अखेरचा गडी बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 133 धावांवर थाबला. चौथ्या दिवशी भारताने केवळ 9 मिनिटे आणि दोन षटकांत सामना जिंकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *