Thu. Jan 21st, 2021

काँग्रेस- JDS आमदारांचा ‘तो’ गोवा प्लॅन कॅन्सल!

काँग्रेस आणि जेडिएस च्या बंडखोर आमदारांनी आता गोव्याला जाण्याचा प्लान रद्द करून मुंबईतच अज्ञात ठिकाणी मुक्काम करण्याचं ठरवलं आहे. एका धमकीनंतर आमदारांनी गोव्याला जाण्याचा प्लान केला होता..

कर्नाटकमधील 14 आमदारांच्या राजीनाम्यावर आज विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार निर्णय जाहीर करणार आहेत. काल काँग्रेस आणि JDS मध्ये बेंगळुरू येथे स्वतंत्र बैठका पार पडल्या. भाजप प्रदेश अध्यक्ष बी एस येदुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा राजीनामा मागितला आहे. 14 आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येणार आहे

सरकार मधून बाहेर पडलेले आणखी एक मंत्री आहेत. ते म्हणजे अपक्ष आमदार आर शंकर.

काल अपक्ष आमदार असलेली मंत्री एत नागेश यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे काँग्रेस आणि JDS चं संख्याबळ 103 झालं आहे, तर भाजपचं 107.

सर्व 14 आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ 113 वरून घटून 106 होणार आहे.

बहुजन समाज पार्टीचे आमदार एन. महेश यांनीही भाजपला समर्थन देण्याचा विचार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *