Sat. Mar 28th, 2020

कॉलेजच्या मैत्रिणींना impress करण्यासाठी ‘ते’ चोरायचे मोबाईल्स!

मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी हॉटेलवर खर्च करण्यासाठी मोबाईल चोरणाऱ्या तीन तरुणांना अटक

काँलेजच्या मैत्रिणींवर इंप्रेशन मारण्याच्या उद्देशाने त्यांना सतत हॉटेलच्या वाऱ्या घडवण्यासाठी मोबाईल चोरणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांना इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे

पोलिसांनी आरोपीकडून 7 मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली आहे

काय घडलं नेमकं?

नागपूर शहरात कॉलेजच्या तरुणांचं मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलंय.

विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोबाईल चोरणाऱ्या आरोपींच्या मागावर होते.

दरम्यान इमामवाडा पोलिसांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली की 3 तरुण नेहमी चोरीचे मोबाईल विकण्यासाठी मोबाईल मार्केट परिसरात फिरत असतात.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्यावर पाळत ठेवायला सुरवात केली.

रस्त्याने मोबाईल वर बोलत असलेल्यांचा मोबाईल हिसकावून आरोपी पळून जात असल्याने पोलिसांनी अनेक ठिकाणी सध्या गणवेशातही कर्मचारी तैनात केले होते.

अखेर पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले.

मोबाईल चोरून पळत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसांचे डोके देखील चक्रावले आहेत.

कॉलेजमधील मैत्रिणींवर इंप्रेशन मारण्याच्या उद्देशाने त्यांना हॉटेलच्या वाऱ्या घडवण्यासाठी पैसे अपुरे पडत होते. त्यांनी मोबाईल चोरीचा मार्ग अवलंबला होता. पोलिसांनी आरोपीकडून 7 मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *