Sat. Feb 27th, 2021

कोरोनाग्रस्तांसाठी मुकेश अंबानींतर्फे १०० बेडचं रुग्णालय

Mandatory Credit: Photo by Indian Photo Agency/REX/Shutterstock (4121524i) Reliance Industries, Chairman and Managing Director Mukesh Ambani 'Make in India' initiative launch, New Delhi, India - 25 Sep 2014

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता राज्य सरकारला मदत करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीने पुढाकार घेतला आहे. मुंबईमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी १०० बेड्सची सुविधा अंबानींतर्फे करण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीने जेमतेम दोन आठवड्यांत रुग्णालय १०० बेडनी सुसज्ज केलं आहे. रिलायन्सच्या रिलायन्स फाऊंडेशन संस्थेद्वारे सरकारला हे सहाय्य केलं आहे. देशात प्रथमच कोरोनाच्या उपचारांसाठी अशा प्रकारे सरकारला सहाय्य केलं आहे.

याशिवाय रिलायन्सतर्फे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. तसंच विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवण्याचं काम रिलायन्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आलं आहे. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे दिवसाला १ लाख मास्क तयार करण्यापर्यंत क्षमता वाढवली. तसंच आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचेही रिलायन्सने घोषित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *