चंद्रकांत पाटलांवर आरोप केले पण दादांवर माझा विश्वास आहे – मुख्यमंत्री
राज्य विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यानी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांचा बचाव केला आहे.

राज्य विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यानी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांचा बचाव केला आहे. चंद्रकांत पाटीलांनी गेले 4 वर्षे खूप चांगल काम केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांचा निर्णय़ चूकू शकतो मात्र त्यांचा हेतू वाईट असू शकत नाही. असे ते म्हणाले आहेत. महिला आणि बालकल्याण मध्ये मोबाईल खरेदीत घोटाळा नाही. असं ही ते म्हणाले आहेत.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
बहुतांश आरोप जुनेच आहेत यावेळी तेच तेच आरोप करण्यात आले. तेही या विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात देण्यात आले. त्यामुळे विरोधकांकडे आरोप करण्यासारखं काही नाही हे दिसलं.
पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालविकास खात्यासंदर्भात मोबाईल फोन खरेदी संदर्भात आरोप खोटे आहेत. असा खुलासा केला यात केंद्र सरकारचा निधी 80 टक्के असतो आणि त्यात 20 टक्के राज्य सरकार त्यामुळे यात काही तथ्य नाही.
मी पाच वर्षे चांगल काम करण्याचा विचार केला. सर्वांना सोबत घेवून काम करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रश्नाकडे सकारात्मक पाहीलं. सोडवण्याचा प्रयत्न केला.
ईव्हीएम बाबत अजित पवार यांचा भाषण जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांनी ऐकलं असतं तर हा मुद्दा आला नसता जेव्हा आपण हरतो ना तेव्हा सत्य स्वीकारलं नाही तर विरोधातच बसावं लागेल.
चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले पण या दादांवर माझा विश्वास आहे. या पाच वर्षात पक्षाने दिलेली जबादारी प्रमाणिक पणे पार पाडली सर्वांना बरोबर घेऊन सकारात्मक राहीले आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला
निवडणूक ओळखपत्रासोबत आधार लिंक करा ही जितेंद्र आव्हाड यांची मागणी निवडणूक ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा विचार करु.