Fri. May 20th, 2022

चॅटमध्ये सिगारेटबाबत बोलणं झालं होतं, अनन्याचे एनसीबीला जबाब

मुंबई : क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी चौकशी दरम्यान आर्यनच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये अनन्या पांडेसोबत केलेले चॅट एनसीबीच्या हाती लागले. त्यामुळे अनन्या पांडेसुद्धा एनसीबीच्या रडारवर आहे. अनन्याची सलग दुसऱ्या दिवशीही एनसीबी कसून चौकशी करत आहे. काल झालेल्या चौकशीचा अनन्याने जबाब दिला आहे. अनन्याने एनसीबीला सांगितले की, त्यावेळी सिगारेट आणण्यावरून आमचे चॅट झाल्याचे अनन्याने सांगितले.

एनसीबीने वीड घेण्याबाबत अनन्याला विचारले असता, ‘आम्ही कुठल्याही प्रकारची ड्रग्ज घेत नाहीत तसेच कधी ड्रग्ज सप्लायही केले नाही,’ असे अनन्याने एनसीबीला सांगितले. ‘मी आर्यन खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत एकत्र शिक्षण घेत होती. आर्यनची बहिण सुहाना खानसुद्धा माझी जवळची मैत्रिण आहे. आर्यन, सुहाना आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सर्व शाळेचे मित्र एकत्र भेटतो.’ असे अनन्या म्हणाली.

वीडही एका प्रकारचे ड्रग्ज आहे हे मला माहित नाही. वीड संदर्भातील चॅट हे त्यावेळी सिगारेट आणण्यावरून झाले होते. मात्र खूप वर्षांपूर्वीचे चॅट असल्यामुळे मला नीट आठवत नाही असे अनन्या एनसीबीला म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.