Wed. Nov 25th, 2020

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

 

सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात लान्स नायक मोहम्मद नासीर शहीद झालेत.

 

राजौरी सेक्टरमधल्या मांजाकोट भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होते.

 

या गोळीबारात लान्स नायक मोहम्मदग नासीर गंभीर जखमी झाले होते.  अखेर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *