जाहीराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही – डॉ. अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेची सांगता आज किल्ले रायगडावर झाली. त्यानंतर महाडमध्ये आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी युती सरकारवर टिकेची झोड उठवली. यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला आहे.
महाड शहरातील शिवाजी चौक येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टिकेचे लक्ष केले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या अनोख्याशैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आता न केलेल्या जाहिराती दाखवुन हे सरकार दिशाभुल करीत आहे. असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.
तसेच यांच्या मागोमाग खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही. असे आवाहन यांनी महाडमध्ये मतदारांना केले आहे.