‘तुझ्यात जीव रंगला’ चा हा कलाकार वादाच्या भोवऱ्यात !

पुण्यातीस औंध येथील PNG ज्वेलर्सचे 25 लाखांचे दागिने घेऊन पैसे न दिल्या प्रकरणी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे कलाकार मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘PNG ब्रदर्स’चे अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी यासंबंधी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
औंधचे PNG ज्वेलर्सचे व्यवस्थापक निलेश दास्ताने यांच्या ओळखीने मिलिंद गणेश दास्ताने यांनी 4 मार्च 2018 ला 25 लाखांचे दागिने खरेदी केले.
यापूर्वी निलेश दास्ताने यांनी तक्रारदारांना फोन करून मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांची पत्नी खरेदीसाठी येत असल्याचे सांगितले.
दागिने खरेदीनंतर मिलिंद यांना चेक बँकेत जमा करण्याचेही बजावले. परंतु चेक बँकेत भरले गेले नाहीत.
त्यानंतर मिलिंद दास्ताने पुन्हा ११ मार्च २०१८ ला खरेदीसाठी आल्यावर त्यांनी यापूर्वी दिलेले चेक परत घेऊन दुसऱ्या बँकेचे पुन्हा दोन चेक दिले. त्यापैकी एक चेक वटलाच नाही.
तक्रारदारांच्या चौकशी दरम्यान मिलिंद कलाकार असून ते व्यवस्थापक निलेश यांच्या ओळखीचे असल्याचे कळाले.
पैसे वेळेवर येत नसल्याचे लक्षात येताच निलेश यांनी मिलिंदना व्याज देण्यास सांगितले.
यादरम्यान, मुंबईमधील स्वतःच्या मालकीची जागा विकून पैसे देतो असे सांगून वेळोवेळी त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण 25 लाख 69 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले.
परंतु, आपण जेवढे सोने खरेदी करू त्याची एकत्रित रक्कम देऊ असे मिलिंद दास्ताने यांनी सांगितले.
त्यानंतर मात्र त्यांना वारंवार संपर्क साधला असता असमर्थता दर्शवल्याने अखेर दास्ताने दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.