दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी-राजेश टोपे
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सण साध्या पद्धतीने करण्यात आले. तसेच यंदाची दिवाळीही साध्या पद्धतीनेच होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मांडणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले दिवाळी जवळ आली असताना आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल अशी मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा दिवाळीत फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी अधिक प्रमाणात असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या रूग्णांना श्वसनाला अधिक बाधा होऊ शकते. यासंर्दभात अधिक काळजी घेतलेली बरी आहे,यासाठीच दिवाळीपूर्वी हा नियम लागू करण्याचा आग्रह राहील.” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणले आहेत जर अशा ठिकाणी कोणी फटाके फोडताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.