दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत परतले

2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावरुन परतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परतले आहेत. आज दुपारी 4 वाजता मुंबईत विशेष विमानाने उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीकडे रवाना झाले. 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला पत्रकार परिषद घेत दिला.
शिवसेनेनं अयोध्येत पहिलं राजकीय पाऊल टाकलं आहे. अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच अयोध्या येथे शिवसेना सदस्य नोंदणीची सुरुवात होणार आहे. आज दुपारी आपला दोन दिवसाचा अयोध्या दौरा आटोपून मुंबईकडे निघाले. यावेळी अयोध्या (फैजाबाद) विमानतळावरून त्यांचे विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर अचानक नीलगाय आली. मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानाने यशस्वी उड्डाण केले.