नयना पुजारी बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषींना आज सुनावणार फाशीची शिक्षा
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
नयना पुजारी हत्याकाडांमध्ये आरोपींवर खून, बलात्कार, अपहरण आणि चोरीचे दोष सिद्ध झाले. आज याप्रकरणी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना कडक शिक्षेची मागणी नयनाच्या कुटुंबीयांनी केली. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तीन आरोपींना आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं.
मात्र, माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला पोलिसांनी अद्यापही हजर केलेलं नाही. त्यामुळे कामकाज सुरु होण्यास विलंब झाला.
पोलिसांच्या ढिसाळपणावर ताशेरे ओढत न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. नयनाचा पती अभिजीत पुजारी यांनी आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.