Thu. Apr 22nd, 2021

प्रचंड पैसा गुंतवल्यानंतर ‘या’ प्रकल्पात पाकिस्तानचा अपेक्षाभंग!

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली असताना या देशाला आणखी एक धक्का बसला आहे.  कराची बंदराजवळ गॅस आणि तेलाचा मोठा साठा मिळण्याच्या अपेक्षेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी खोदकाम सुरु केलं होतं. मात्र तेथेही पाकिस्तानची फजिती झाली आहे. त्यामुळे हाती काहीच न लागल्याने हे कामही बंद करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.

कराची बंदरावर पाकिस्तानचा अपेक्षाभंग!

2019 च्या सुरुवातीला कराची बंदराजवळ खनिज तेल आणि गॅसचे साठे सापडल्याचं इम्रान खान सरकारने जाहीर केलं होतं.

हे साठे इतके प्रचंड आहेत, की यापुढे पाकिस्तानला कधी तेलाची आयात करावी लागणार नाही, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली.

या साठ्यांमुळे पाकिस्तानाच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रचंड फरक पडेल आणि पाकिस्तान जगातील प्रगत देश बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

अरबी समुद्रात सुरू झालं होतं खोदकाम!

सरकारच्या आदेशानंतर पाकिस्तानचे तेल आणि पेट्रोलियम मंत्री नदीम बाबर यांनी कराची बंदराजवळ अरबी समुद्रात खोदकाम सुरु केलं.

या खोदकामासाठी सुमारे 1500 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले.

साडेपाच हजार मीटरपर्यंत खोदकामही करण्यात आलं, तरीही हाती काहीही लागलं नाही.

यापूर्वीही या ठिकाणी 17 वेळा खोदकाम करण्यात आलं.

चार महिन्यांपूर्वी ENI या इटालियन कंपनीकडून हे काम करण्यात येत होतं. यात अमेरिकन आणि पाकिस्तानी कंपन्यांची भागीदारी होती.

1963 पासून पाकिस्तान तेलविहिरींमध्ये अपेक्षेने खोदकाम करतंय. मात्र दरवेळी त्यांना अपयशालाच सामोरं जावं लागतंय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना त्यांना या तेलसाठ्यांकडून मोठी अपेक्षा होती. मात्र पाकिस्तानच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *