फुकटची दारू महागात, बाटली युवकाच्या गुदद्वारात!

ट्रेनमध्ये दारू पिण्यास मनाई असतानाही रेल्वेत अनोळखी लोकांसोबत दारू पिणं उत्तर प्रदेशातील युवकाला चांगलाच महागात पडला आहे. या युवकाच्या गुदद्वारात दारूची बाटली घालण्यात आली होती.
काय घडलं नेमकं?
आपल्या आईला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशाच्या मुरादाबादवरून 22 तरूण चंदिगडला गेला.
मात्र तिथे त्याच्या पोटात अचानक दुखू लागलं.
डॉक्टरांकडे गेल्यावर त्याचा X-ray काढण्यात आला. मात्र हा X-Ray पाहून सारेच हैराण झाले. या तरूणाच्या गुदद्वारात चक्क दारूची अख्खी बाटली अडकलेली होती.
याबाबत तरुणाने आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र ट्रेनमधील सहप्रवाशांवर त्याने संशय व्यक्त केला.
मुरादाबादहून चंदिगडला येताना ट्रेनमध्ये त्याला काही अनोळखी तरुणांचा गट भेटला. ते बेकायदेशीररीत्या ट्रेनमध्ये मद्यपान करत होते.
त्यांच्याबरोबर युवकानेही ट्रेनमध्ये मद्यप्राशन केलं. मात्र दारू जास्त झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली.
त्यानंतरच त्याला भेटलेल्या अनोळखी तरुणांच्या गटाने हा विकृत उपद्व्याप केला असावा, असा संशय युवकाने व्यक्त केला.
मात्र अशा पद्धतीने त्याच्यासोबत विकृत चाळे केले गेले आणि या युवकाला समजलंही नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दारूच्या बाटलीत नेमकं काय होतं, ते ही आता तापसण्यात येत आहे. तसंच या युवकाचं काही सामान चोरीला गेलं का, याचीही आता तपासणी होत आहे. आता युवकाने अज्ञान तरुणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.