Wed. Jan 19th, 2022

फॅशन शोमध्ये टळली यामी गौतमची ‘फजिती’!

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमवर नुकताच एक बाका प्रसंग गुदरला. ‘उरी’ सिनेमातून यशाची चव चाखत असलेल्या यामी गौतमचा एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना चक्क तोल गेला.

व्हिडिओ झाला व्हायरल!

‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ मध्ये यामी सहभागी झाली होती.

यावेळी तिने सुंदर असा गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता.

मात्र, रॅम्पवर चालताना ड्रेस यामीच्या पायात अडकल्यामुळे यामीचा तोल गेला.

यामी रॅम्पवर पडणार होती.

मात्र, तिची फजिती होता होता थोडक्यात बचावली.

मात्र त्यानंतर न थांबता तिने रॅम्पवॉक पूर्ण केला.

त्यावेळीही लांबलचक झगा तिच्या परत परत पायात अडकत होता.

तरीही यामीने रॅम्पवॉक पूर्ण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *