Fri. Jan 21st, 2022

बायकोच्या प्रियकराची ह’त्या करायला पळालेल्या आरोपीला 12 तासांत अटक!

मयत पत्नीच्या प्रियकराचा खू’न करण्यासाठी कारागृहातून पळालेल्या आरोपीला देहूरोड पोलिसांनी केली 12 तासात अटक केली.पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून 2011साली तिचा खू’न केल्याप्रकरणी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात आरोपी शिक्षा भोगत आहे.

आरोपीने शौचालयाच्या बहाण्याने कारागृहातून पलायन केलं. परंतु रुपीनगर तळवडे येथे आईला भेटण्यासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत बेड्या ठोकत त्याची रवानगी पुन्हा कारागृहात केली.

काय घडलं नेमकं?

अशोक लक्ष्मण भाग्यवंत वय 32 असं पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आरोपीचं नाव आहे.

अशोकचे लग्न 10 वर्षांपूर्वी परभणी येथील अश्विनी निसर्गंध सोबत झालं होतं.

परंतु लग्नाच्या 9 महिन्यानंतर अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत अशोकने तिचा खू’न केला.

याच खु’नाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

त्यानंतर त्याची रवानगी अहमदनगर येथील विसापूर कारागृहात करण्यात आली होती.

मागील 8 वर्षापासून अशोक विसापूर कारागृहात खु’नाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे.

परंतु मयत पत्नीबरोबरचे असलेले पूर्वीचे अनैतिक सबंध असल्याचा संशय राग मनातून गेला नव्हता.

त्यामुळे पत्नीच्या प्रियकराचा खू’न करण्यासाठी अशोक कारागृहातून पळून गेला.

ही धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली.

रुपी नगर येथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटून पैशाची जमवाजमव करून अशोक परभणीला जाणार होता.

तेथे मयत पत्नीच्या प्रियकराचा खून करणार असल्याची कबुली अशोकनेच पोलिसांना दिली.

परंतु त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी वेळेत अशोकच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची रवानगी बारा तासात पुन्हा कारागृहात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *