मनसे नेत्यांकडून विधानसभा निवडणूका लढण्याचे संकेत
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार असल्याचे संकेत आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत. पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार असल्याचे संकेत आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत. पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे. आज 36 मतदारसंघातील विभाग प्रमुखांची बैठक राजगडावर घेण्यात आली.
या बैठकीत सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह केला आहे. आता या बैठकीचा अहवाल राज ठाकरेंना सादर केल्यानंतर ते अंतिम निर्णय घेतील असं सांगत मनसेनं निवडणूक लढवली तर जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
आतापर्यंत पक्षाने एकला चलो ची भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे. ईव्हीएमवर शंका असल्यामुळे निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु निवडणूक लढवण्याबाबतचा अतिंम निर्णय पक्षप्रमुखांचा असेल. असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.