मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

मुंबईमध्ये लॉकडाऊननंतरही परिस्थिती बिकट आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे ७९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७७५ झाली आहे. इतकंच नव्हे तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचंही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
ज्या ९ जणांचा आज मृत्यू झाला, ते वयस्कर होते. तसंच त्यां सर्वांना इतरही आरोग्यविषयक समस्या होत्या असं सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत चिंतेचं वातावरण आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरणवणाऱ्यांना जरी परवानगी असली, तरी बाहेर पडताना त्यांनी मास्क घालणं सक्तीचं आहे. मास्क लावलेला नसल्यास दंड भरावा लागणार आहे.
कल्याण डोंबिली परिसरातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आता या परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ४३ झाली आहे. यांपैकी २ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर ३३ जणांवर उपचार सुरू आहे. कल्याण पूर्वेत ८ तर कल्याण पश्चिमेला ८ असे एकूण १६ रुग्ण कल्याणमध्ये आहेत. तर डोंबिवली पूर्वेत २० रुग्ण आढळून आले आहेत. डोंबिवली पश्चिमेला ७ कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. याशिवाय टिटवाळ्याला १ कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.