Thu. Jul 9th, 2020

म्हणून आता पोलिस चोरांनांच घेणार दत्तक

 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

 

नागपूरमध्ये चोरीच्या घटनेत मागील काही महिन्यांत झपाट्यानं वाढ झाली आहे.  

 

त्यामुळे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर निंयत्रण मिळवण्याच्या उद्देशानं चोरट्यांना दत्तक घेण्याची नवीन योजना नागपूर पोलिसांनी केली.

 

या योजनेनुसार पोलिसांनी चोरट्यांची यादी तयार केली असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली.  ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीतील काही गुन्हेगार दत्तक म्हणून देण्यात आले.

 

त्यानुसार दत्तक घेणारा संबंधित कर्मचारी त्या गुन्हेगाराच्या नियमित त्यांच्या संपर्कात असणार आहे. तसेच गुन्हेगार घरी आहे की नाही याची माहिती वरच्यावर घेत राहणार आहेत. तर, एकट्या धंतोली पोलीस ठाण्यात 202 गुन्हेगारांना

दत्तक घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *