लेखाजोखा 16 व्या लोकसभेच्या कामकाजाचा

16 व्या लोकसभेचा आज शेवटचा दिवस होता. 30 वर्षानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं होत. या पाच वर्षात संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलं कामकाज झालं, अनेक महत्वाची विधेयक पारित झाली. मात्र राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे अनेक विधेयकाला विरोध झाला. कित्येक सत्रामध्ये कामकाज वाया गेलं. 10 टक्के आरक्षण, GST विधेयक सर्वसमंतीने पारित झालं.
मात्र मोदी सरकारची महत्वाकांक्षी तिहेरी तलाक आणि नागरीकत्व संधोधन विधेयक मंजूर होऊ शकले नाहीत. मात्र 5 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रातल्या खासदारांची कामगिरी दमदार होती.
कामकाजावर महाराष्ट्राच्या खासदारांचा कामगिरीचा ठसा
लोकसभेत एकुण 156 तर राज्यसभेत 118 विधेयक
जीएसटी विधेयकावर दोन सत्रात 12 तास चर्चा
भूसंपादन विधेयकावर 10 तास चर्चा झाली
लोकसभेत 46 तर राज्यसभेत 33 विधेयक रखडले
NDAच्या कार्यकाळात लोकसभेच कामकाज 83 टक्के, तर UPA-2 कार्यकाळात 63 टक्के
पाच वर्षात लोकसभेच्या 327 तर राज्यसभेच्या 325 बैठका
फेब्रुवारी- एप्रिल 2018 चं सत्र सर्वात जास्त गोंधळाचं
या सत्रात 127 तास 45 मिनिटांचं कामकाज वाया गेलं
गोपाळ शेट्टी,यूपीचे भैरो प्रसाद मिश्रा, ओडीसाचे कुलमणि समल, हरियाणाचे रमेश चंद्र कौशीक हे खासदार 100 टक्के उपस्थित
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहीते पाटील यांनी सर्वांत जास्त प्रश्न विचारले (1100 पेक्षा जास्त प्रश्न विचारले)
त्यांच्या खालोखाल शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हजारपेक्षा जास्त प्रश्न मांडले.
राहुल गांधी यांची लोकसभेतली एकुण उपस्थिती 52 टक्के होती.
राहूल गांधीनी एकुण 14 चर्चेत भाग घेतला, एकही प्रश्न विचारला नाही.
झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वात जास्त 48 खाजगी विधेयक माडंलीत.
गोपाळ शेट्टी यांनी 32 खासगी विधेयक मांडली.