विरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू – नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा आज जळगावात झाली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव मध्ये उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी नक्की आहेत कुठे? कॉंग्रेसचे नेते बँकॉकला, कार्यकर्ते महाराष्ट्रात असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच कोण खरा पहिलवान आहे, हे निकालानंतर कळेलच असे आव्हान करत पवारांच्या पक्षात राहायला कुणी तयार नाही अशी टिका त्यांनी यावेळी केली आहे. त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
सर्वप्रथम कसं काय जळगाव, तुम्ही देणार ना महाजनादेशला मत असे बोलून मोदींनी भाषणाला मराठीतून सुरूवात केली आहे.
येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला साथ द्या. नव्या भारताचा नवा जोश हा मोदींमुळे नाही तर आपल्या मतांमुळे आहे.
जगभरात भारताचा गौरव होत आहे. जनतेच्या विश्वासामुळे पुन्हा एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
स्त्रीशक्तीचा जागर देशाने मानला आहे. 70 वर्षांनंतर काश्मीरमधील जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले.जम्मू काश्मीर, लडाख फक्त जमीन नव्हे तर भारताचे मस्तक आहे.
देशातील काही पक्षांचा आणि नेत्यांचा राष्ट्रहिताच्या निर्णयांचा विरोध करणे दुर्देवी आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीची भाषा शेजारच्या देशासारखी वाटते, असे म्हणत आघाडीवर टीका केली आहे.
तसेच विरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. असे वक्तव्य मोदींनी केले आहे.