विवेकच्या ‘त्या’ meme वर सलमान खानची प्रतिक्रिया!

अभिनेता विवेक ओबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रायसंदर्भात केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यावर विवेक ओबेरॉयने अखेर ते ट्वीट डिलीट केलंय. या ट्वीटवरून विवेक ओबेरॉय चांगलाच गोत्यात आला होता. सिनेसृष्टीतील सोनम कपूरसह अनेकांनी या ट्वीटवरून विवेकवर टीका केली होती.
या ट्वीटवर उत्तर देताना ज्यांचं मीम केलंय त्यातील लोक काही बोलत नाहीत, तर इतरांना का त्रास होतोय, असं विवोक ओबेरॉय म्हणाला होता.
‘त्या’ Meme मधील लोकांची तक्रार नाही, तर इतरांना कसला त्रास?- विवेक ओबेरॉय
मात्र त्यानंतर अखेर त्याला माफी मागून हे ट्वीट डिलीट करावं लागलं. या ट्वीटबद्दल ऐश्वर्या राय बच्चन हिचे सासरे अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही नाव न घेता प्रतिक्रिया दिली होती.
आता अभिनेता सलमान खाननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऐश्वर्या राय बच्चनवरून सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात वाद झाले होते.
सलमान खानची प्रतिक्रिया-
मी याकडे लक्ष देत नाही.
पूर्वी जशी tweets करायचो, तसे ट्वीटही आता करत नाही.
अशावेळी memes तरी कुठून पाहू?
मी काम करू की Tweets, memes आणि कमेंट्स पाहत बसू?
असा उलटा सवाल करत त्याने या मीमबद्दल प्रतिक्रिया दिली.
भारत चित्रपटासाठी लोकं नवराही सोडू शकतात; मात्र प्रियांकाने चित्रपट सोडला – सलमान खान