वेळप्रसंगी काश्मीरसाठी जीव देवू – अमित शाह
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. यावेळी लोकसभेतही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. परंतु अमिक शहांनी गोंधळातही हा प्रस्ताव मांडला.

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. यावेळी लोकसभेतही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. परंतु अमिक शहांनी गोंधळातही हा प्रस्ताव मांडला. सोमवारी तितक्याच गोंधळात हा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे. लोकसभेत हा प्रस्ताव मांडत असताना काश्मीरप्रश्नी जीव देखील देवू आणि कायदा करत असताना कोणीही रोखू शकत नाही असं अमित शाह म्हणाले आहेत.
370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर
जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. वेळप्रसंगी काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी आहे. असं म्हणतं अमित शाह यांनी लोकसभेत मांडली. काश्मीरबाबत कायदा करण्यास कोणीही रोखू शकत नाही तसेच फक्त काश्मीरच नाही पाकव्याप्त काश्मीरही भारतात येईल. असं ही ते म्हणाले आहे.
कुठल्या नियमांच उल्लंघन केलं ते सांगा? असा सवाल अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदच सर्वोच्च आहे असंही अमित शाह म्हणाले आहेत. यावेळी अमित शाह यांच्या निवेदनादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली.
आम्हाला देशाचं हित हवं आहे असं काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं होतं परंतु भाजपा खासदारांच्या गदारोळाने ते शांत बसले. काश्मीर हा अंतर्गत प्रश्न कसा? असा सवाल विरोधकांनी यावेळी केला आहे. सरकारने रातोरात नियमांच उल्लंघन केलं असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. यावेळी लोकसभेतही विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. परंतु अमिक शहांनी गोंधळातही हा प्रस्ताव मांडला.