शाहरुख खानला ‘The University of London’कडून डॉक्टरेट!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ‘The University of London’ने शाहरुख खानला मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केलीय.
‘या’ विषयात मिळाली SRK ला डॉक्टरेट-
‘The University of London’ने फिलाँथ्रॉपी म्हणजेच समाजसेवेसाठी शाहरूखला Doctorate पदवी बहाल केली आहे.
शाहरुख खान आपल्या दिवंगत वडिलांच्या नावाने चालवत असलेल्या ‘मीर फाऊंडेशन’तर्फे अनेक सामाजिक कार्यं केली जातात.
Acid Attack पीडितांसाठी देखील ही संस्था काम करते.
शाहरुख खानने या पुरस्कारासाठी University चे आभार मानले आहेत.
तसंच तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
तुम्ही दिलेली पदवी आमच्या मीर फाऊंडेशनला पुढेही निस्वार्थ काम करण्याची प्रेरणा देत राहील असं SRK ने Tweet मध्ये म्हटलंय.
Thank u for the honour @universityoflaw & my best wishes to the graduating students. It will encourage our team at @MeerFoundation to strive ‘selfishly’ to share more. pic.twitter.com/IBI1I6UlFY
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 4, 2019
शाहरुखला यापूर्वी 2009 साली ‘युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशॉयर’ तर्फे पदवी मिळाली आहे.
2015 साली ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग’तर्फेही SRK मानद पदवीने पुरस्कृत करण्यात आलं.
यासंदर्भात शाहरूखने University चे आभार मानले आहेत.
गेल्या काही काळापासून Bollywood मध्ये शाहरुखच्या movies पूर्वीइतकी कमाल दाखवू शकल्या नाहीत. तरीही त्याची जगभरातील craze मात्र तशीच आहे. तसंच त्याच्या सामाजिक कार्यातही खंड पडलेला नाही.