Sun. Mar 7th, 2021

धक्कादायक! पुन्हा मुलीचा जन्म झाल्याने जन्मदात्या आईनेच केली हत्या

नाशिकच्या आडगाव येथे पुन्हा मुलीचा जन्म झाल्यामुळे आईनेच 10 दिवसाच्या चिमुरडीची हत्या केली आहे. तिसरीपण मुलगी झाल्यामुळे चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याचे महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एकीकडे मुलींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.

तिसरीपण मुलगी झाल्याने चक्क आईनेच 10 दिवसाच्या चिमुरडीचा गळा दाबून हत्या केली.

ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली आहे.

हत्या करणाऱ्या आईचे नाव अनुजा काळे असे आहे.

महिलेच्या पतीनेच पोलिसांत जाऊन तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी आरोपी अनुजा काळेला अटक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *