Fri. Apr 23rd, 2021

खारघरच्या पाळणाघरात चिमुकलीला मारहाण; आयाला 10 वर्षांचा तुरुंगवास

 

 

खारघर येथील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात 2016 साली 10 महिन्याच्या बालिकेला पाळणाघरमधील महिला कर्मचारी अफसाना शेखने  मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने पाळणाघरातील महिला कर्मचाऱ्याला 10 वर्षांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

खारघरच्या पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात महिला कर्मचारीने 10 महिन्याच्या बालिकेला मारहाण केली होती.

ही घटना 2016 साली घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता.

या सीसीटीव्ही फूटेजमध्ये महिला बालिकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत होते.

तसेच मारहाणीनंतर चिमुकलीच्या डोळ्यात मिर्चीची पूडही टाकण्यात आली होती.

या मारहाणीत चिमुकलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

या चिमुकलीवर वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होता.

याप्रकरणी अलीबाग सत्र न्यायालयाने आज सुनावणी दिली.

या सुनावणीत महिला कर्मचाऱ्याला 10 वर्षांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *