Sun. Jul 5th, 2020

आंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. यावर अभ्यास करुन पुढील पावलं उचलली जातील, अशी प्रतिक्रिया मुख्य सचिव डी.के जैन यांनी दिली आहे. मराठा आरक्षण लागू न झाल्यास 25 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ने दिला होता. मात्र यावर आंदोलन करण्याऐवजी 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

‘मराठा आरक्षणावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. मी तुम्हा सर्वांना 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करण्याची विनंती करतो’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर केल्यानंतर हा अहवाल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अहवाल विधिमंडळात मांडला जाईल.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे अशी मागणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.मराठा समाजाच्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारला सादर करण्यात आला.समाजात आरक्षणाच्या लढाईबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यात सासवडपासून संवाद यात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही.अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच टिकू शकते असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 58 मोर्चे काढले.मात्र अजूनही सरकार दिरंगाई करत आहे. आताही हिवाळी अधिवेशन 19 तारखेला सुरू होत असताना आरक्षणाचा प्रश्न पुढे टाकला जात आहे.या संदर्भांत 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा.तसेच समाजाला कुठल्याही न्यायलयात वैध ठरणाऱ्या पद्धतीप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *