Thu. Jan 20th, 2022

12 वर्षीय विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या; विद्यार्थी ताब्यात

Labeled remains of person lying in mortuary

मुंबईतील गोवंडी परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थ्याने शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाची शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेबरोबर आईचा वाद झाल्यामुळे विद्यार्थ्याने हत्या केल्याचे समजते आहे. आयेशा अस्लम हुसीए असे मृत शिक्षिकेचे नाव असून अल कौसर या उर्दू हासस्कूलमध्ये शिक्षिका होती.

नेमकं काय घडलं ?

गोवंडीमध्ये एका 12 वर्षीय विद्यार्थ्याने शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेवर धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

शिक्षिकेचा वाद विद्यार्थ्याच्या आईबरोबर झाल्यामुळे त्या रागात हत्या केल्याचे समजते आहे.

30 वर्षीय आयेशाकडे विद्यार्थी शिकवणीसाठी येत होता.

रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास शिकवणीसाठी आले असताना विद्यार्थ्याने चाकू घेत पोटात आणि पाठीत खुपसून वार केला.

राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी शिक्षिकेला दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती शिक्षिकेच्या शेजाऱ्यांनी शिवाजी नगर पोलिसांना दिली.

पोलिसांनी विद्यार्थी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *