Sun. Apr 18th, 2021

खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वरळी सी लिंकजवळ 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नुकतीच गोरेगाव मध्ये चिमुकला नाल्यामध्ये पडल्याची घटना घडली होती. दिव्यांशचा शोध घेणं अजूनही सुरू आहे. तोवरचं वरळी सी लिंकजवळ पुन्हा अशी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. यामध्ये 12 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

नुकतीच गोरेगाव मध्ये चिमुकला नाल्यामध्ये पडल्याची घटना घडली होती. दिव्यांशचा शोध घेणं अजूनही सुरू आहे. तोवरचं वरळी सी लिंकजवळ पुन्हा अशी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. यामध्ये 12 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यात बुडून बबलूचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

वरळी सी लिंकजवळ खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

वरळी सी लिंकजवळ कोस्टल रोडचं सध्या काम सुरू आहे. याच कोस्टल रोडसाठी एक मोठा खड्डा या ठिकाणी खोदण्यात आला होता.

रस्त्याचं बांधकाम असल्यामुळे खड्डा बऱ्यापैकी मोठा होता. पावसामुळे या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी साचलं होतं आणि एखाद्या छोट्या विहिरीसारखंच स्वरूप या खड्ड्याला आलं होतं.

बबलू कुमार रामपुनील पासवान हा 12 वर्षांचा मुलगा या ठिकाणाहून जात असताना तोल जाऊन तो या खड्ड्यात पडला.

खड्ड्यात पाणी नसतं, तर कदाचित बबलूला वाचवण्यात यश आलं असतं. मात्र, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यात बुडून बबलूचा मृत्यू झाला.

गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव परिसरातल्या नाल्यांमध्ये एनडीआरएफचे जवान चिमुकल्या दिव्यांशचा शोध घेत आहेत.

मात्र तशीच एक घटना वरळी सी लिंकजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *