नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू

नागालॅंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. घडलेल्या घटनेमुळे नागालॅंडमध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी तातडीने घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ठार झालेले नागरिक हे त्यांचे काम संपल्यानंतर त्यांच्या घरी परतत होते. रात्री उशीरापर्यंत घरी न पोहोचल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागालॅंडचे मुख्यमंत्र्यांनी नागालॅंडमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशीसाठी उच्चस्तरीय एसआयटी नेमली आहे. तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.