झोक्याने घेतला 13 वर्षीय मुलीचा जीव

झोका खेळता खेळता झोक्याचा दोर गळ्यात आवळला गेल्याने फास लागून १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी शिरसोली इंदिरा नगर येथे घडली.
बालिकेचे नाव राधा लक्ष्मण भिल आहे. तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात कुटुंबियांनी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगर येथे राहत्या घरात राधा ही मुलगी झोका खेळत होती. अचानक तिच्या गळ्या भोवती दोर आवळला गेल्याने फास लागला .त्यात ती बेशुध्द होवून खाली पडली. ही घटना शनिवारी घडली आहे.
गल्लीतील नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर राधा हिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले. बालिकेचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला.
हे कुटुंब मुळचे मेहरुण येथील असून उदरनिर्वाहासाठी शिरसोलीला स्थायिक झाले आहेत. या प्रकरणी एमआडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.