Sat. Feb 27th, 2021

कर्नाटकात 14 बंडखोर आमदार अपात्र; सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागणार

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू असून कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता स्थापन केली. मात्र शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएसचे -3 तर कॉंग्रेसचे 11 एकूण 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी 3 आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय ?

कर्नाटकात कुमारस्वामी यांचं सरकार कोसळ्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता स्थापन केली आहे.

मात्र विधानसभा अध्यक्ष के.आर रमेशकुमार यांनी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले.

त्यामुळे आता एकूण 17 अपात्र आमदारांची संख्या झाली आहे.

बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर अध्यक्षांनी चालूपणा केला नसल्याचे म्हटलं आहे.

त्याचबरोबर 15व्या विधानसभेची मुदत संपपर्यंत अपात्र आमदार निवडणूक लढू शकणार नसल्याचेही म्हटलं आहे.

सध्या विधानसभेची सदस्य संख्या 207 झाली असून बहुमातासाठी 104 आमदारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं जात आहे.

मात्र भाजपाकडे 105 आमदार असून सोमवारी येडियूरप्पा यांना सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *