देशात सोमवारी १४ हजार ३०६ नवे कोरोना रुग्ण

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच अनेक नागरिकांचे लसीकरणसुद्धा झाले आहेत. मात्र सोमवारी देशात कोरोनाचे १४ हजार ३०६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १८ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशातील ४४३ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
भारतात नुकताच १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. भारतात आजपर्यंत १०२ कोटी २७ लाखांहून नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात एकूण २१ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.