Tue. Jan 19th, 2021

15-20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुका – चंद्रकात पाटील

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता लगबग लागली आहे ती विधानसभा निवडणुकीची. आगामी विधानसभा निवडणुका 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पार पडतील अशी शक्यता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. तसेच 15 सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखांचं भाकीत दर्शवल आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक होणार असल्याची शक्यता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.

तसेच 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

चालू विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरला संपत असल्यामुळे या तारखांना निवडणुका पार पडतील असं म्हटलं जात आहे.

पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील दाखल झाले होते.

यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी विधानसभा निवडणुकांचे भाकीत दर्शवलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली आहे.

यंदा लोकसभा निवडणुकांप्रमाणेच 220चा आकडा पार करणार असल्याचे म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *