Thu. Apr 22nd, 2021

धक्कादायक! PUBGसाठी मुलाने वडिलांचे 50,000 चोरले

‘PUBG’ या खेळासाठी देश-विदेशातील असंख्य अल्पवयीन मुलं प्रचंड वेडी झाली आहेत. भारतात PUBG खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. PUBGचे दुष्परिणामही समोर येऊ लागली आहेत. पंजाबमधील जालंधरमध्ये एका 15 वर्षीय मुलाने वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहायाने चक्क 50 हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या 15 वर्षीय मुलाने हे पैसे PUBGसाठी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

बाइकचे मॅकनिक असलेल्या वडिलाच्या खात्यातून 50 हजार रुपये वजा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पैसे चोरीला गेले. पण कोणताही ओटीपी आणि ट्रान्झॅक्शनचा मेसेज त्यांना मोबाइलवर आला नाही.

मग पैसे खात्यातून गेले कसे?, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवल्यानंतर याचा उलगडा झाला.

पेटीएममधून पैसे गेले असून या पैशातून पबजीसाठी गेमिंग पॅडसह PUBG मोबाइल स्क्रीन आणि गेमिंग अॅक्सिसरिज खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले.

गुगल प्लेस्टोअर किंवा अॅप स्टोरमधून PUBGसाठी लागणारे साहित्य खरेदी करता येऊ शकते.

या मुलाने त्याच्या मित्राच्या पेटीएम खात्यावरून PUBGसाठीच्या साहित्याची खरेदी केली. नंतर या मुलाने वडिलाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मेसेज डिलिट केला.

वडिलांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलाने पोलिसात केलेली तक्रार मागे घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *