Thu. Mar 4th, 2021

Corona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. महाराष्ट्र देखील कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. हा संसर्ग वाढू नये याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन केलाय. मात्र मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना कोरोना लॉकडाउन फटका बसला आहे.

मेळघाटातील आदिवासी होळी सणानंतर कामाच्या शोधत स्थलांतर करतात. अशाच कामाच्या शोधात समुद्रपूर येथे गेलेले ११ युवकांना लॉकडाऊनमुळे कोणतीही सुविधा मिळाली नसल्याने त्यांनी समुद्रपूर ते धामणगाव असा पायदळ १५० किमीचा प्रवास केलाय.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे पोहोचताच तहसिलदारांच्या मदतीने सामाजिक संघटनानी पुढाकार घेऊन त्यांची व्यवस्था केली. स्थानिकांनी ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांची मेळघाटात जाण्याची व्यवस्था केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *