Fri. Feb 28th, 2020

मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे, याचं पार्श्वभूमीवर आणखी एका तरूणीने आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे.

सोमवारी नगर मध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने वस्तीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधाबाई काळे महाविद्यालयात 11 वीत शिकत असलेली किशोरी बबन काकडे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नावं आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा अरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचे तिने म्हंटले आहे.

किशोरीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मला दहावीत 89 टक्के गुण मिळून अनुदानीत तुकडीत प्रवेश मिळू शकलेला नाही.

चांगले गुण असुनसुध्दा विनाअनुदानीत तुकडीत प्रवेश घ्यावा लागला त्यासाठी मला 8 हजार रुपये भरावे लागले.

किशोरीनं महाविद्यालयातील वसतीगृहाच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *