Sat. Mar 6th, 2021

अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळून 16 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

वृत्तसंस्था, श्रीनगर

 

अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस दरीत कोसळली आहे. काश्मीरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.

 

या अपघातात 16 भाविकांचा मृत्यू झाला तर 35 भाविक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार जम्मूमधील रामबन जिल्ह्यातील बनिहालजवळ

जम्मू-श्रीनगर महामार्गावर आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य जोरात सुरु आहे.

 

अपघातातील 19 गंभीर जखमींना उपचारांसाठी हवाई मार्गाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. तर 8 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

 

अमरनाथ यात्रेकरुंना अनेक संकट कोसळत आहेत. आठवडाभरापूर्वीच दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात

दहशतवाट्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर तीन पोलिसांसह 32 जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *