Mon. Jun 14th, 2021

प्रेमप्रकरणातून 17 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीची हत्या

प्रेमप्रकरणातून एका कॉलेजमध्ये (college) 12 वीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे घडली आहे. तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतःच्याही पोटात चाकू भोसकलं. यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रणिता कोंबे असं प्रेमप्रकरणातून (Love affair) हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे.

प्रणिता ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगाव मधील सेफला हायस्कूलमध्ये 12 वीमध्ये शिकत होती.

6 जानेवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान कॉलेजला जात होती.

त्याच सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

एका तरुणाने तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले.

त्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

यात तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झालेला आहे.

पोलीस पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *