विजेच्या धक्का लागल्याचे पाहिल्यावर मदतीसाठी धावला अन्…

नाशिकमध्ये शेतात काम करत असताना विजेचा धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
नाशिकमधील देवळा तालुक्यातील मेशी येथे विजेचा झटका लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
बांधलेली म्हैस सुटल्याने तिला पकडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बांधावर असलेल्या वायरचा विजेचा झटका बसला. तो वायरला चिकटल्याचे लक्षात येताच दुसराही यास वाचवायला धावला. तेव्हा तोही वायरीला चिकटला गेला असून यात त्याचाही मृत्यू झाला.
संदीप शिरसाट आणि भुषण असे मृत झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
तसेच त्या दोघांना पाहिल्यावर वाचवण्यासाठी गेलेल्या तिसराही त्यांच्या मदतीसाठी धावला असता. त्यालाही विजेचा तीव्र झटका बसून तो गंभीर जखमी झाला आहे.
तिसरा गंभीर असून त्याला मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.