Thu. Oct 22nd, 2020

पुणे विमानतळावर 2 किलो 196 ग्राम सोने जप्त

पुणे : विमानतळावर 2 किलो 196 ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे. सीमाशुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या सोन्याची किमंत 74 लाख इतकी आहे.

स्पाईस जेट विमानातल्या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. जुहेर जाहिद पेनकर असे या प्रवाशाचे नाव आहे. सीमाशुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

सीमाशुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (7 डिसेंबर) पहाटे 4.15 वाजता दुबईहुन स्पाईस जेटचे विमान पुणे विमानतळावर उतरले. या विमानातून उतरलेल्या जुहेर जाहिद पेनकर या प्रवाशाच्या हालचाली सीमाशुक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या.

त्याला बाजूला घेऊन अंगझडती घेतली असता 2 किलो 196 ग्राम सोने आढळले. आरोपीच्या कमरेला बांधलेल्या एका प्लास्टिक बॅगमध्ये आणि अंडरवेअरमध्ये लपवून त्याने हे सोने आणले होते. पोलिसांनी हे सर्व सोने जप्त केले असून जुहेर जाहिद पेनकर याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *