Wed. May 18th, 2022

‘राज्यात २ लाख ६४ हजार कोरोनाबाधित’ – राजेश टोपे

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे तर काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे.

राज्यात २ लाख ६४ हजार कोरोनाबाधित असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तर नागरिकांनी कोरोना चाचणी सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे राजेश टोपे म्हणाले. बुधवारी मुंबईत ५६ हजार कोरोना चाचण्या झाल्या असून राज्यात रॅपिड अँटिजन टेस्टसुद्धा वाढवत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळत होते. मात्र गेल्या काही मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर आता नाशिक, नागपूर, नांदेड, रायगडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच आयसोलेशन, ऑक्सिजन बेड हे सरासरीपेक्षा ४ ते ५ टक्के भरलेले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर राज्यातील ८७ टक्के कोरोना रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून गेल्या २४ तासांमध्ये नाशिकमध्ये २ हजार ९९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये खुली पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर मराठवाड्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळले आहेत. औरंगाबादमध्ये बुधवारी १ हजार ०९७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून औरंगाबाद शहरात ७६७ तर ग्रामीण भागात ३३० कोरोना रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ३५ टक्क्यांवर पोहचला असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

1 thought on “‘राज्यात २ लाख ६४ हजार कोरोनाबाधित’ – राजेश टोपे

  1. OMG! It is like you understand my mind! You seem to know so much about this, just like you wrote the book in it or something. I think that you can do with some pics to drive the message home a bit, besides that, this is outstanding blog post. A great read. I will definitely revisit again.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.