Wed. Feb 26th, 2020

लज्जास्पद… पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडिओ अपलोड, दोघांनाअटक

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून अनेक चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड (2 men arrested for uploading Child Pornography videos) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने याची माहिती पुणे पोलिसांना दिल्यानंतर दोघा भावांविरोधात खडक पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षणाचं माहेरघर, तसंच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख आहे. मात्र याच पुण्यात तरुण मुलांनी वेबसाईटवर चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ ऑनलाइन अपलोड केल्याची घटना उघडकीस आलीय. पुण्यात आत्तापर्यंत अश्याप्रकारचे तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. यातला पहिला गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

गुरुवार पेठेत राहाणारा राजकरण पुट्टीलाल या 24 वर्षीय तरुणाला तसंच मनोजकुमार झल्लार सरोज या रविवार पेठेत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

भारतातच नव्हेतर तर जगात चाईल्ड पोर्नोग्राफी हा गंभीर गुन्हा समजला जातो.

परदेशात नॉर्मल पोर्नोग्राफीला काही आक्षेप नसला तरी चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे.

त्यामुळे अश्या प्रकारचे जे कुणी असे व्हिडिओ अपलोड केल्यावर या गुन्ह्यात सुटका मिळण्याची शक्यता नसते.

इंटरनेटवर कोण कधी काय अपलोड करेल हे आपल्याला ठरवणं शक्य नसतं. ते थाबवणंही शक्य नसून अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आलेली आहेत. मशीन लर्निंगच्या सहाय्याने जे कुठले मटेरियल असेल, किंवा आक्षेपार्ह असेल अश्या गोष्टी तपासून त्या थांबवल्या जाऊ शकतात. तरी याचा काही युजर्सना त्रास देखील होऊ शकतो असं मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र अश्याप्रकारच्या घटना महाराष्ट्रात आणि पुण्यासारख्या शहरात घडत असतील तर ती लाजिरवाणी बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *