राज्यातले २ कोरोनाग्रस्त रुग्ण व्हेंटिलेटरवर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवार १९ मार्चच्या दुपारी १ पर्यंत ४९ वर पोहचला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या ४९ रुग्णांपैकी २ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी ४० रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. तर उर्वरित ९ जणं हे या कोरोना संसर्ग असलेल्यांच्या संपर्कात आल्यानं त्यांना कोरोना झाला.
#HelthMinisterLive : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
व्हेंटिलेटरवर असलेल्या २ रुग्णांना वगळता उर्वरित सर्व कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान कोरोनाची लागण झालेलेी ४८ वी रुग्ण ही 22 वर्षांची तरूणी आहे. ती इंग्लंडवरून आली आहे. तर कोरोनाचा 49 वा रुग्ण हा मूळचा अहमदनगरचा आहे. हा तरुण दुबईहून आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा-महाविद्यालय ३१ मार्चंपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. ही जमावबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे.
गुरुवार १९ मार्चपासून मुंबईतील बेस्ट बसमधून प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नाहीये. पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरमध्ये दारुबंदीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.