Thu. Apr 22nd, 2021

20 रुपयाची नवी नोट, नोटेवर महाराष्ट्रातील ‘हे’ पर्यटनस्थळ

‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’तर्फे आता 20 रुपयाची नवी नोट चलनामध्ये येणार आहे. आत्तापर्यंत आलेल्या नोटांप्रमाणेच ही नोट देखील वेगळ्या आकर्षक रंगामध्ये असणार आहे. या नोटेचा रंग हिरवट पिवळा असणार आहे. मात्र ही नवी नोट जरी भारतात सुरू होणार असली, तरी जुन्या 20 नोटाही चलनात राहणारच आहेत.

या नव्या नोटेवरील चित्र

नव्या नोटांवर असणारी देशाचा सांस्कृतिक वारसा सांगणारी अनेक पर्यटनस्थळाची चित्रं तुम्ही पाहिली असतील. 20 च्या नव्या नोटेवरही देशाचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिक असणारं एक स्थळ पाहायला मिळेल. विशेष म्हणजे हे स्थळ महाराष्ट्रातील जागतिक वारसास्थळांच्या यादीतील पर्यटनस्थळ आहे. हे स्थळ म्हणजे वेरूळची लेणी…

 वेरूळची ही लेणी का आहे खास?

औरंगाबादपासून काही अंतरावर असणाऱ्या वेरूळच्या लेण्यांचा समावेश अजिंठाप्रमाणेच जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.

सह्याद्रीमध्ये 5व्या शतकापासून ते 10 व्या शतकादरम्यान एकंदर 34 लेण्या खोदण्यात आल्या आहेत.

यांत 12 बौद्ध, 17 वैदिक आणि 5 जैन लेणी आहेत.

यातील 16 व्या क्रमांकाची हिंदू लेणी ही तत्कालीन शिल्पकलेचा कळसाध्याय मानली जाते.

ही लेणी कैलास लेणी म्हणून ओळखली जाते.

आधी कळस मग पाया अशा स्वरूपात एकसंध खडकात खोदलेली एवढी भव्य लेणी हे स्थापत्यकलेचा अद्भूत नमूना मानला जातो.

याच लेणीचं चित्र 20 रुपयांच्या नव्या नोटेवर पाहायला मिळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *