Wed. Jan 26th, 2022

२० – २० विश्वचषक : न्यूझीलॅंडविरुद्ध भारताला विजय आवश्यक

  ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला कट्टर विरोधी संघ पाकिस्तानसोबत पराभव पत्करावा लागला. आता २०-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना न्यूझीलॅंड संघासोबत रंगणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोहली बिग्रेडला ‘डू ऑर डाय’ची लढाई लढावी लागणार आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत दाखल  होण्यासाठी हा सामना विजयी होणे आवश्यक आहे.

  भारताला पाकिस्तान संघाकडून अपमानास्पद हार स्विकारावी लागल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलॅंडसोबत लढणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचे लक्ष भारताच्या विजयाकडे लागलेले आहे. भारत आणि न्यूझीलॅंड या दोन्ही संघांना हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. परिणामी भारत आणि न्यूझीलॅंड संघ पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभूत झाले आहेत.

  भारत आणि न्यूझीलॅंड या दोन्ही संघांपैकी आज कोणत्या संघाचे पारडे जड असणार आहे याबाबत अंदाज बांधणे अवघड आहे. कारण दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या १६ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ८ सामने जिंकले आहेत. तसेच विश्वचषकात भारत आणि न्यूझीलॅंड दोन वेळा आमने-सामने आले होते आणि दोन्ही वेळा न्यूझीलॅंडने भारताला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण विजयी आणि कोण पराभूत होणार याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *